Pune News : कोंढव्यात विक्रीसाठी आणलेले आंबे चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News – विक्रीसाठी आणलेले १ लाख ८ हजार रुपयांचे आंबे चोरून नेल्याचा प्रकार साईनगर, कोंढवा परिसरात घडला असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी एका २२ वर्षीय तरुणीने येवलेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी साईनगर, कोंढवा येथील हॉटेल साळवेगाईनसमोरील मोकळ्या जागेत आंबे विक्रीसाठी कापडी मंडप उभारला होता.
चोरट्यांनी ११ एप्रिल रोजी रात्री २ ते पहाटे ६ वाजण्याच्या दरम्यान १ लाख ८ हजार रुपयांचे आंबे चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.