Pune News : सीए मिलिंद काळे यांना बँकींग फ्रंटीयर्सचा जीवन गौरव पुरस्कार !

पुणे – बँकींग फ्रंटीयर्सने नुकत्याच लखनौ येथे आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक्स अॅन्ड क्रेडिट सोसायटीज् लि. (नॅफकब) चे अध्यक्ष लक्ष्मी दास यांच्या हस्ते हा पुरस्कार काळे यांना प्रदान करण्यात आला.
काळे कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष तसेच चार्टर्ड अकाउंटंटस् इन को-ऑपरेटीव्ह बँक्स् (CACOB) या संस्थेचे उपाध्यक्ष, दि महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटीव्ह फेडरेशनच्या संचालक मंडळावर स्वीकृत सदस्य, को-ऑपरेटीव्ह बँक्स् ऑफ इंडिया नवी दिल्ली या संस्थेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत.
काळे यांचे सहकार क्षेत्रातील अमूल्य योगदान व त्यांनी सहकार क्षेत्रासाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
काळे सन २०१४ पासून बँकेचे अध्यक्ष असून त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत कॉसमॉस बँकेला एका नवीन शिखरावर नेऊन ठेवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉसमॉस बँकेने मार्च २०२४ अखेर रू.३५,००० कोटींचा व्यवसाय व रू.३८४ कोटींचा विक्रमी निव्वळ नफा संपादन केला.
सदर पुरस्कार सोहळ्यात कॉसमॉस बँकेस बेस्ट एमआयएस अॅनॅलिटीक्स, बेस्ट एसओसी इनिशिएटीव्ह, बेस्ट एचआर इनोव्हेशन, बेस्ट एएमएल अॅन्ड केवायसी अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.





