Pune News : वकिलांचे सोमवारचे कामकाज बंद स्थगित
Updated On:

पुणे : वकील संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी शिवाजीनगर न्यायालयासह जिल्ह्यातील सर्व न्यायालयात वकिलांनी सोमवारी (दि. ३ नोव्हेंबर) पुकारलेला बंद स्थगित करण्यात आला आहे. सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने बार कौन्सिल अॉफ महाराष्ट्र आणि गोवाने बंद मागे घेतला.
त्यानुसार पुणे बार असोसिएशनने बंद मागे घेतला आहे. सोमवारी नेहमीप्रमाणे वकील कामकाजात सहभागी होतील, असे बार असोसिएशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने आगामी अधिवेशनात याबाबत बिल मांडण्याचे आश्वासन दिल्याने हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी दिली.




