पुणे – कोथरुड येथील एका इसमावर जुन्या वादातून लोखंडी रॉड ने मारहाण केल्या प्रकरणात सराईत गुन्हेगार मुख्य आरोपी सिद्धांत मराठे वय ( २६) रा. कोथरुड, पुणे, याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलेला आहे.
सिद्धांत सह आणखी एका आरोपी विरुद्ध जबरी मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणे संदर्भात कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्यात आला होता.
नोव्हेंबर २०२३ मध्ये भा.द.वी. कलम ३०७ , ३२४, ३४ अन्वये एका इसमाचा जुन्या वादातून डोक्यात लोखंडी रॉड ने वार करून खूनाचा प्रयत्न करने प्रकरणी एफ.आय.आर दाखल करुन सदर आरोपी विरुद्ध कोथरुड पोलिसांनी २०२३ मध्ये स्थानबद्धतेची कारवाई केलेली होती.
सदर आरोपीने अॅड अभिषेक हरगणे , अॅड ओंकार फडतरे , अॅड अजिंक्य पोळ यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. बचाव पक्षा तर्फे अॅड . हरगणे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश एस.आर साळुंखे साहेब यांनी ३० हजाराचा जातमुचल्क्यावर आरोपीस जामीन मंजूर केला आहे.