pune news : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्वाकांक्षी समजल्या जणार्या स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छ सर्वेक्षणात सासवडच्या शिरोपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या स्पर्धेत नगरपालिकांच्या गटात सासवडला पहिला क्रमांक मिळाला असून राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी दिल्ली येथे करण्यात आले.
तर, मध्य प्रदेशातील महू कॅन्टोन्मेंटलाही विशेष पुरस्कार मिळाला असून आमदार संजय जगताप यांचे भाऊ आणि महू कॅन्टोन्मेंटचे मुख्याधिकारी म्हणून राजेंद्र जगताप यांनाही राष्ट्रपती मुर्मू यांच्या यांंच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. या पुरस्कार वितरण सोहळयावेळी सासवड गावचे सुपूर्त्र संजय जगताप आणि राजेंद्र जगताप या दोन्ही बंधूचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.
देशातील सर्वात स्वच्छ नगरपरिषद –
मागील वर्षी ( २०२२) सासवड नगर परिषदेस स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विषेश परितोषिकाने गौरविण्यात आले होते. यावेळी केंदीयमंत्री हरदिपसिंग पुरी यांच्या हस्ते नगरपरिषदेस देण्यात आलेला पुरस्कार आमदार संजय जगताप यांनी स्विकरला होता.
तर, महू कॅन्टोंन्मेंटची जबाबदारी राजेंद्र जगताप यांच्याकडे असताना महू बोर्डास देशातील स्वच्छ कॅन्टोंन्मेंट मध्ये महूला तिसरा क्रमांक मिळाला होता, त्याचा पुरस्कार राजेंद्र जगतपा यांना केंद्रीयमंत्री पूरी यांच्याच हस्ते देण्यात आला.
त्यानंतर सलग दुसर्यावर्षी सासवड आणि महू बोर्डास विशेष पुरस्काराने गौरविले जाणार असून यावेळी दोन्ही भावांना राष्ट्रपतीच्या हस्ते गौरविण्यात आले आहे. यावेळी सासवडसाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख,
मुख्याधिकारी डाॅ. कैलास चव्हाण यांनी स्विकारला तर महू कॅन्टोंन्मेंटच्या वतीने महूचे विद्यमान मुख्याधिकारी विकास बिष्णोई, माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.