Pune News: दहशतवाती हल्ला झाला तर.? पुण्यातील प्रसिद्ध ‘पब’ला पोलीस आयुक्तांची नोटीस

पुणे – पोर्शे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला. यानंतर लागलीच फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एल-थ्री बारमधील ड्रग्जचे प्रकरण पुढे आले.
यामुळे पोलिसांनी पब आणि बारसंदर्भात आणखी कडक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी “बॉलर’ या पबला सणसणीत नोटीस पाठवली आहे. यामध्ये “सध्या अतिरेकी कारवायांबाबत अलर्ट आहे.
एखादी अतिरेकी संघटना गर्दीचे ठिकाण लक्ष्य करुन बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवू शकते. यामुळे आपला डिस्कोथेप परवाना रद्द का करण्यात येऊ नये?’ अशी विचारणा केली आहे. यामुळे पब इतरही चालकांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याणीनगर येथील ‘बॉलर’ नावाच्या पबला ही नोटीस बजावण्यात आली आहे. हा पब अरविंद लालचंद यादव (मे. हॉटेल इस्कापिझम हॉस्पिटॅलिटी एलएलपी) यांच्या मालकीचा आहे.
या पबमधुन बाहेर पडलेल्या आयटीतील तरुण- तरुणीला पोर्शे कारने चिरडले होते. शहरातील हा सर्वात मोठा पब असून विकेंडला येथे तोबा गर्दी असते.





