Pune News : पद्मावती परिसरात दोन दुचाकींची समोरा समोर जोरदार धडक; दोघेही गंभीर जखमी
Updated On:

पुणे : पुणे सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात बीआरटी मार्गा मध्ये दोन दुचाकी स्वाराचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी समोरा समोर धडकल्याने दोन्ही दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना रविवारी (दि.८) सायंकाळी ७.३० च्या सुमारास घडली. पुणे सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गातून दुचाकी स्वार जात होते, यात पल्सर आणि ऍक्टिव्हची समोरासमोर धडक झाली, अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, त्याच बरोबर सहकारनगर पोलिसांना माहिती दिली.





