Pune News | मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभाग शनिवारी, रविवारी बंद
Updated On:

प्रभात वृत्तसेवा
पुणे – मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला विभाग शनिवारी (दि. ६) (साप्ताहिक सुटी) आणि रविवारी (दि. ७) अनंत चतुर्दशीचा दुसरा दिवस असल्याने बंद राहणार आहे. तर, फूल विभागही रविवारी बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी माल विक्रीस आणू नये. खरेदीदारांनी खरेदीस येऊ नये, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.
दरवर्षी अनंत चतुदर्शीच्या दुसऱ्या दिवशी मार्केट यार्डातील फळ, भाजीपाला आणि फूल विभाग बंद असतो. त्याप्रमाणे रविवारी यंदाही बंद राहणार आहे. फळ, भाजीपाला विभागाला शनिवारी साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे फळे, भाजीपाला विभाग शनिवारीही बंद राहणार आहे. तर शनिवारी फूल बाजार मात्र सुरू राहणार आहे. गूळ-भुसार विभागाला रविवारी साप्ताहिक सुटी असते. त्यामुळे तो नेहमीप्रमाणे बंद राहणार आहे.





