Pune News : मित्राचा खून करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी पकडले

पुणे – मित्राचा खून करुन फरार झालेल्या आणि खेड पोलिसांना हवा असलेल्या आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. निवडणूकीच्या अनुषंगाने गस्त घालताना संशयावरुन आरोपीस ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्या चौकशीत तो खून करुन फरार झाल्याचे उघड झाले. आरोपीला खेड पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले आहे.
सलमान अबुलगणी शेख ( २३, सलमान सोफा फर्निशिंग, वडगाव रोड. आळंदी,पुणे मुळ रा- मु.पो.अलिपुर बजार) असे अटक आरोपीचे नाव आहे. बंडगार्डन पोलिसांचे पथक गस्त घालत असताना ससून रुग्णालयाजवळ पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बड, मनोज भोकरे आणि मनीष संकपाळ यांना आरोपी संशयास्पदरित्या दिसून आला.
त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सहकार्य केले नाही. सखोल चौकशीत मात्र त्याने खेड येथील खरपुडी फाटा येथे मित्र शरद गायकवाड याचा ३ नोव्हेंबर रोजी चाकुने खून करुन पळून आल्याचे सांगितले. यानंतर खेड पोलिसांशी संपर्क साधण्यात आला.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील , पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक धीरज गुप्ता, उपनिरीक्षक स्वप्निल लोहार , उपनिरीक्षक प्रदीप शितोळे ,मोहन काळे ,पोलीस अंमलदार महेश जाधव ,ज्ञाना बडे, शिवाजी सरक, मनोज भोकरे ,मनीष संकपाळ यांचे पथकाने केली.





