पुणे – भुगाव मुळशी येथील एका तरुणास स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करून तसेच खंडणी मागून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 2023 मध्ये घडली होती. त्याप्रकरणी संतोष धुमाळ व त्याच्या इतर साथीदार विरुध्द तीन नोव्हेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकणात एकूण पाच आरोपी विरूध्द अपहरण, खंडणी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न संदर्भात पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. आरोपी संतोष धुमाळ याने ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांच्या मार्फत जामीनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपी विरुद्ध हेतुपूर्वक ही फिर्याद दाखल केली आहे फिर्याद दाखल करण्यास 4 दिवसाचा विलंब असून आरोपीने अपहृत व्यक्तीस वेठीस ठेवून कुठल्याही प्रकारची खंडणी मागितली नाही. त्यामुळे खंडणी चे कलम आरोपीस लागू होत नाही. तसेच आरोपी विरूद्ध पूर्वीच्या मोका व खुनासारखे 21 केस प्रलंबित आहेत त्यात हे कारण जामीन नाकारण्यास पुरेसे नाही. असा युक्तिवाद आरोपी तर्फे ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांनी केला. असा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. नाशिककर यांच्या न्यायालयाने पन्नास हजार रुपये च्या जातमुचालक्यावर जामीन मंजूर केला.