Pune News : पुण्यातील 110 वर्ष जुन्या चर्च ऑफ होली एंजल्स येथे ईस्टर संडे आनंदात साजरा

पुणे : खिश्चन बांधवांचा पवित्र सप्ताह आणि चाळीस दिवसांच्या उपवासाची सांगता आज ‘ईस्टर संडे’च्या प्रार्थनेने झाली. यावेळी येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थान दिवसाच्या निमित्ताने कॅथलिक आणि प्रोटेस्टंट संप्रदायांच्या चर्चमध्ये धर्मगुरुंच्या उपस्थितीत खिचन बांधवांनी विशेष प्रार्थना केली.
चर्च ऑफ होली एंजल्सला 110 वर्ष पूर्ण
चर्च ऑफ होली एंजल्स हे चर्च रास्ता पेठ पुणे या ठिकाणी असून या चर्चची स्थापना 1915 रोजी झालेली आहे व आज या चर्चला 110 वर्षे पूर्ण झाली आहेत. भल्या पहाटे काढण्यात आलेल्या पुनरुत्थान दिंड्यांनी ईस्टर संडेची सुरुवात झाली. ठिकठिकाणच्या दिंड्यांमध्ये भाविक सहकुटुंब सहभागी झाले होते. सकाळी सहाच्या सुमारास प्रभुभोजनाने या दिंड्यांची सांगता झाली.
का साजरा केला जातो ईस्टर संडे?
या दिवसाचा अर्थ असा आहे की ख्रिश्चन समाजामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे त्याच्या सर्व अनुयायांचा व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आजच्या दिवशी असा विश्वास आहे व त्या विश्वासा संदर्भात पवित्र शास्त्र बायबल यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे की गुड फ्रायडे दिवशी त्याला कुरुसावर टांगण्यात आले व तो सर्व मानव जातीसाठी व त्यांच्या पापासाठी मरण पावला आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे ईस्टर संडे दिवशी तो पुनरुत्थीत झाला म्हणजे तो उठला गेला आणि म्हणून ख्रिश्चन समाजामध्ये अतिशय महत्त्वाचा दिवस ईस्टर संडे म्हणून साजरा होतो कारण त्या दिवशी सर्वजण विश्वास ठेवणारे घोषणा देऊन म्हणतात प्रभू उठला आहे खरोखर तो उठला आहे खरोखर त्याचे पुनरुत्थान झालेले आहे. अशा घोषणा देऊन आपला विश्वास प्रगट करत असतात.





