Pune News : कौटुंबिक न्यायालयात ई फायलिंग सेंटर सुरू

पुणे – कौटुंबिक न्यायालयात दि पुणे लॅायर्स कंझ्युमर सोसायटीचे ‘ई-फायलिंग सेंटर’ सुरू झाले आहे. या सेंटरचे उदघाटन नुकतेच कौटुंबिक न्यायालयचे प्रमुख न्यायाधीश शाम रूक्मे , पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड आणि फॅमिली कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड.गणेश कवडे यांचे हस्ते झाले.
सर्वौच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता ई -फायलिंग बंधनकारक झाले आहे. या पार्श्वभूमीवर हे केंद्र महत्त्वाचे ठरणार आहे. कंझ्युमर सोसायटी शिवाजीनगर न्यायालयात २०२३ पासून ही सेवा देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयात हे सेंटर सुरू करण्याची मागणी होत होती. या सेंटरमधून वकील आणि पक्षकारांना अल्पदरात सेवा देण्यात येणार आहे.
सर्वांनी या सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन कझ्युमर सोसायटीच्या चेअरमन ॲड. रेखा करंडे यांनी व सर्व संचालक मंडळाने केले आहे. यावेळी पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. राजेंद्र दौंडकर, ॲड. सुभाष पवार, ॲड. संतोष खामकर, ॲड. विकास ढगे, ॲड.एन.डी.पाटील , ॲड. एकनाथ सुगावकर , ॲड. विजयसिंह निकम, ॲड.राम भुजबळ , ॲड.राणी कांबळे, ॲड.फैयाज शेख यांच्यासह वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.





