pune news : डॉ. श्रीकांत शिंदेंच्या हस्ते होणार पौडला येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन !
Updated On:

पिरंगुट -पौड येथे मंगळवारी शिवसेना (Shiv Sena) जनसंपर्क कार्यालायाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व मुळशीचे माजी सभापती बाळासाहेब चांदेरे यांनी दिली.
पौड येथे मंगळवारी सकाळी अकरा वाजता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.
तसेच पौड येथील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत भोजन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचे देखील उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले.






