Pune News : महसूल मंत्री बावनकुळे आणि प्रदीप कंद यांच्या गळाभेटीची चर्चा !

वाघोली – राज्यात भाजप सरकारला निर्विवाद वर्चस्व मिळाले असून युतीचे सरकार स्थापन झाले असताना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिरूर हवेली विधानसभा अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या गळाभेटीची जिल्ह्यात सध्या चर्चा होऊ लागली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कंद यांनी मोलाची कामगिरी केली आहे. पक्षाने सोपवलेली जबाबदारी आद्य कर्तव्य मानत पक्ष संघटना मजबूत करून पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कंद आणि त्यांचे सहकाऱ्यांनी जिल्ह्यात खूप परिश्रम घेतले आहे.
भाजपच्या संघटनेतील एक नेता मंत्री झाला याचा आनंद मोठा असल्याने जेव्हा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षाला कार्यकर्ता भेटतो तेव्हा तो आनंद द्विगुणीत होतो अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.
महसूल मंत्री पदी विराजमान झाल्याबद्दल आबासाहेब सोनवणे, प्रदीप कंद, रामभाऊ दाभाडे यांनी मंत्री बावनकुळे यांची भेट घेतली. यावेळी बावनकुळे यांनी कार्यकर्त्यासोबत गळाभेट करून आनंद द्विगुणित केला आहे. जिल्ह्यात सध्या या गळाभेटीची चर्चा होऊ लागली आहे.





