Pune news : अविनाश लगड यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेले अविनाश लगड यांनी आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
या प्रसंगी त्यांच्या सोबत अनेक सहकाऱ्यांनीही पक्षप्रवेश केला. युथ फाऊंडेशन माध्यमातून वेगवेगळया सामाजिक प्रश्नांसह, युवकांसाठी रोजगार, महिला, ज्येष्ठनागरीक यांच्यासाठी वेगवेगळया सामाजिक उपक्रमांकाच्या माध्यमातून लगड यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आहे.
लगड म्हणाले, युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजकार्य करत असताना मला जाणवले की, समाजकार्यास राजकारणाची जोड मिळाली तर ते कार्य अधिक प्रभावी व अचूक होते. त्यामुळेच मी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पक्षात सामावून घेत माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन, असेही त्यांनी सांगितले. लगड यांनी स्पष्ट केले.
तसेच महिला आरोग्याच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यासह, आपल्या मित्रपरिवार, लगड कुटुंब, स्नेही व सर्व समर्थकांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त करत राष्ट्रवादी काॅग्रेसच्या माध्यमातून सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले.





