Pune News: ‘खेळातुन व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास’ – डॉ. रुपेश थोपटे

पुणे – खेळातुन शारीरिक, मानसिक व भावनिक स्वास्थ्य निर्माण होते. याबरोबरच व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकासही होतो, असे मत डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रुपेश थोपटे यांनी व्यक्त केले.
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या येरवडा येथील डॉ.आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयात शारीरिक शिक्षण व क्रीडा, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्तपणे राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
य़ावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्र्थानी प्रेरणा उमरखेडी होत्या. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.गौतम बनसोडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी संपत शिंदे यांच्यासह अन्य प्राध्यापक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
आजची तरुण पिढी टिव्ही, मोबाईलचा वापर करण्यात जास्त गुंतलेली असल्याने त्याचे विपरित परिणामही संबंधित तरुणांच्या मनावर होतात. विद्यार्थ्यांनी नको त्या गोष्टींसाठी वेळा वायाला घालवु नये.
शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी व्यायाम करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. विद्यार्थ्यांनी आपआपल्या आवडीचे खेळही खेळायलाच पाहिजेत, असे मतेही डॉ. रुपेश थोपटे यांनी व्यक्त केले आहे.
विद्यार्थ्यांनी जिमखाना, क्रीडांगणाचा अधिकाधिक वापर करायला पाहिजे. खेळाच्या माध्यमातुन शासकीय नोकरीची संधी प्राप्त करुन उत्तम करीयर करण्याला विद्यार्थ्यांनी प्राधान्य देण्याची गरज आहे, असे डॉ.गौतम बनसोडे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपत शिंदे यांनी केले. सूत्रसंचालनसुवर्णा कांबळे यांनी केले. आभार धीरज गडहिरे यांनी मानले.





