Pune News : ‘दि लॉयर्स कन्झ्युमर्स’ सोसायटीच्या चेअरमनपदी अॅड. रेखा करंडे
Updated On:

पुणे – ‘दि पुना लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटीव्ह’ सोसायटीच्या चेअरमनपदी अॅड. रेखा करंडे (दांगट पाटील) यांची निवड झाली आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील सोसायटीच्या कार्यालयात सोमवारी (दि. ५) चेअरमनपदासाठीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. यामध्ये त्या विजयी झाल्या.
अध्यक्ष अॅड. हेमंत गुंड यांनी राजीनामा दिल्याने चेअरमनचे पद रिक्त झाले होते. त्यामुळे झालेल्या निवडणूकीत १६ संचालकांनी मतदान केले. त्यामध्ये, करंडे यांना १० मते मिळाली. अध्यासी अधिकारी म्हणून व्ही. एल. सुपेकर यांनी काम पाहिले.
लॉयर्स कन्झ्युमर्स ही राज्यात एकमेव वकिलांची सोसायटी आहे. संस्थेचे नऊ हजार वकील सभासद आहेत. संस्थेतर्फे संस्थेच्या सभासदांना व ग्राहकांना स्टॅम्प पेपर, ई-चलन, लिव्ह अँड लायसन्स आणि न्यायालयीन कामकाजासाठी आवश्यक असणारी स्टेशनरी पुरविली जाते.





