Pune News : खराडी येथील फार्मसी महाविद्यालयांमध्ये 75 वा संविधान दिन उत्साहात साजरा

पुणे – खराडी येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव उ र सळ कॉलेज ऑफ फार्मासिटिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर या महाविद्यालय मध्ये दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी 75 वा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील प्राध्यापक नितीन नेहरकर यांनी केले.
तसेच सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह संविधान प्रास्ताविक याचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस महाविद्यालयातील द्वितीय वर्ष पदविका विभागाच्या सीमा चौधरी आणि अथर्व पाटील या विद्यार्थ्यांनी संविधान निर्मितीचा इतिहास व भारतीय संविधानाचे महत्त्व याबद्दल मनोगत व्यक्त केले.
सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर अशोक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच डॉक्टर अशोक भोसले यांनी सर्व विद्यार्थ्यांना 75 व्या संविधान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ही दिल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पदविका महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुजित काकडे यांनी आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून या संविधानाद्वारे सर्व भारतीयांना मिळालेले मूलभूत हक्क आणि त्यांचे कर्तव्य यांची थोडक्यात माहिती दिली.
सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदविका विभागाच्या प्राध्यापिका शुभांगी कारखिले यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पदवी विभागातील प्राध्यापक नितीन नेहरकर यांनी केले . सदरचे कार्यक्रमाचे उत्कृष्ट रित्या आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापिका भाग्यश्री शेलार यांनी केले.





