Pune News : पर्यावरण पूरक शाडूच्या गणेश मूर्ती बनवणे स्पर्धेत 145 मुलांचा सहभाग
Pune News : न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या प्रशालेमध्ये गेली 40 वर्ष चालू असलेला हा उपक्रम यावर्षीही विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. शाळेचा माजी विद्यार्थी शिल्पकार रोहन भोसले याने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दिले.
आणि विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती साकार केल्या त्यामध्ये शंकराचे रूप धारण केलेला गणेश ‘खंडोबाचे रूप धारण केलेला गणेश ‘झोपडीतला गणेश,कैलास मधला गणेश, अशी गणपतीची विविध रूप विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारली आहे.
शाळा समिती अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी या प्रकल्पाचे खूप कौतुक केले नवीन शिक्षण धोरणामध्ये अशाच प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे असे ते म्हणाले. या मुर्त्यांचे प्रदर्शन शाळेमध्ये भरवण्यात आले होते.
त्याचे उद्घाटन व परीक्षण किरण सरोदे यांनी केले. याप्रसंगी शालाप्रमुख सुनिता राव, जनार्दन नाईक पर्यवेक्षिका डॉ कविता गायकवाड, देविदास झोडगे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या प्रकल्पाचे विभाग प्रमुख हनुमंत तोडकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.





