Pune Navratri : श्री महालक्ष्मी मंदिरात रंगली पौराणिक कथांची रंगभूमी ; जाणून घ्या कोणत्या कथांनी जिंकले मन

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भारतीय संस्कृतीमध्ये पौराणिक कथांचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्या कथांमधील एकलव्याची गुरुभक्ती, गोरा कुंभाराची विठ्ठलभक्ती आणि भ्रष्टाचारासारख्या आधुनिक राक्षसाचा वध अशा अनेक कथा नाट्य स्पर्धेतून उपस्थितांसमोर उलगडल्या. विश्वकर्मा विद्यालय मराठी माध्यमिक शाळेने यामध्ये प्रथम क्रमांक मिळावीत विजेतेपद पटकाविले.श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित लोककथा नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी महालक्ष्मी मंदिरात झाली. या स्पर्धेमध्ये शहरातील ५० शाळांनी भाग घेतला होता.
त्यापैकी अंतिम चार शाळांचे सादरीकरण मंदिरात करण्यात आले. यावेळी संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, विश्वकर्मा पब्लिकेशनचे विशाल सोनी, इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, विश्वकर्मा विद्यालय संचालिका मधु शितोळे, विश्वकर्मा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुलभा देशमुख, सुनंदा सरडे उपस्थित होते.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या विश्वकर्मा विद्यालयाला (माध्यमिक) रोख ११ हजार रुपये, सन्मानचिन्ह, द्वितीय विजेत्या पुष्पा इंटरनॅशनल स्कूलला रोख सात हजार रुपये, सन्मानचिन्ह, तृतीय विजेते विश्वकर्मा विद्यालयास (प्राथमिक) रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण डॉ.मृणाल अन्नदाते, संजय जोशी, रवींद्र सातपुते, अपूर्वा भिलारे, माया कुरुळेकर, डॉ. राधाकृष्ण बटुले यांनी केले. सूत्रसंचालन सतीश सहिंद्रे यांनी केले.




