Pune Navale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात !, कंटेनर पलटी

Updated On:

पुणे – नवले पुलाजवळ नव्या बोगद्यातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटला आणि तो कठड्यावर अडकून भीषण अपघात झाला आहे. हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास बंगळुरू मुंबई महामार्गावर झाला आहे.

सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत.

कात्रज कडून मुंबईच्या दिशेने वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कंटेनर दुभाजकावर आढळला या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाने धाव घेतली आहे. दरम्यान कंटेनर खाली अडकलेल्या चालकाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून दोन किलोमीटरच्या वाहनांच्या रांगाच-रांगा लागल्या आहेत. पोलीस व अग्निशामन दलाच्या मदतीने कंटेनर रस्त्याच्या कडेला हटवण्याचे काम सुरु आहे.

नवले पुलावरील अपघाताची मालिका अजून संपलेली नाही हे दिसून येते मागच्या आठवड्यामध्ये दैनिक प्रभात ने या ठिकाणी लावलेल्या सूचना फलका संदर्भात बातमी दिली होती परंतु प्रशासनाने त्यावर कोणतीच कारवाई केलेली दिसत नाही लावलेले सूचना फलक फक्त नावापुरतीच आहे की काय असे यावरून दिसून येत आहे.

सिंहगड रस्ता वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उदय शिंगाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथम दर्शनी ही चालकाची चूक आहे असे दिसते भरधाव वेगाने धावून येणारा हा कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे हा अपघात झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाने अडकलेल्या चालकांची सुखरूप सुटका करून त्याला नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे.

आणखी संबंधित बातम्या

Weather alert : तो आजही बरसणार..! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; 'या' जिल्ह्यांत गारपीठ आणि वादळी पावसाचा इशारा

2026-04-03 09:04:24

Weather alert : तो आजही बरसणार..! हवामान विभागाकडून अलर्ट जारी; 'या' जिल्ह्यांत गारपीठ आणि वादळी पावसाचा इशारा

Pune news : पावसाने पुणे ठप्प.! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण तरीही पोलिस वसुलीतचं रमले

2026-04-02 21:30:05

Pune news : पावसाने पुणे ठप्प.! वाहतूक कोंडीने नागरिक हैराण तरीही पोलिस वसुलीतचं रमले

Pune Rain News : धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण.! तासाभरातच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांची झाली तारांबळ

2026-04-02 19:44:02

Pune Rain News : धो धो पावसाने पुणेकरांची दाणादाण.! तासाभरातच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद, नागरिकांची झाली तारांबळ

Pune News : करमोळीत पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा

2026-04-02 19:05:28

Pune News : करमोळीत पारंपरिक पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय

2026-04-02 19:04:35

Pune Rain : वादळी पावसाने पुणेकरांना झोडपलं.! शहरात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित, रस्तेही झाले जलमय