Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे महामार्गाने आज प्रवास टाळाचं; तब्बल १५ तासांपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा
Pune Mumbai Expressway : गेल्या १५ तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी

Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे महामार्गाने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर उलटल्याने काल संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
अपघाताला १५ तास उलटले तरी अजून या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे एक्स्प्रेस वेवर लांबच लांब रांगा लागल्या असून शेकडो वाहनं वाहतूक कोंडीत अडकली आहेत.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रोपिलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. त्यातून गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट पसरली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.
१५ तासांपासून वाहतुक कोंडी
गेल्या १५ तासांपासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी) या महामार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. आडोशी बोगद्याजवळ पलटी झालेला टँकर काढण्यास प्रशासनाला अजुनही यश आले नाही.
त्यामुळे या महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. येथे २५ किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वाहतूक कोंडीमुळे पुण्याकडून मुंबईला जाण्यासाठी ताम्हिणी घाटातील रस्ता वापरला जात आहे.
Baramati News : युरोपमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय शिक्षण परिषदेसाठी डॉ. सागर आटोळे यांची निवड
पर्यायी मार्ग:
१. ताम्हिणी घाट मार्ग: पुणे – पौड – ताम्हिणी घाट – माणगाव – मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
२. माळशेज घाट मार्ग: पुणे – चाकण – नारायणगाव – माळशेज घाट – कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त) Pune Mumbai Expressway:
प्रवाशांकडून संताप व्यक्त
दरम्यान, प्रवासी कार आणि हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून खोपोलीमार्गे वळवण्यात आली आहे. रात्री 11 नंतर पुण्याकडे जाणाऱ्या लेनवरून काही प्रमाणात मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू करण्यात यश आले असले, तरी वेग मंदावलेला आहे.
या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णांना देखील बसला आहे. १५ तासांपेक्षा जास्तीचा काळ उलटूनही या मार्गावरील अपघातग्रस्त वाहन हटविण्यात आले नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Pune Mumbai Expressway:
हेही वाचा :






