पुणे: ‘जैन वधू-वर परिचय संस्थे’च्या अध्यक्षपदी मुकेश शहा यांची नियुक्ती

पुणे: जैन वधू-वर परिचय संस्था, पुणे यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाच्या सदस्यांची नुकतीच एक महत्त्वाची बैठक संस्थेचे मावळते अध्यक्ष दिलीपभाई मेहता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
निश्चित करण्यात आलेले पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्य खालीलप्रमाणे आहेत:
अध्यक्ष: मुकेश मनोज शहा
उपाध्यक्ष: रोहित चंद्रकांत झवेरी
सेक्रेटरी: भावेश रमेश शहा
खजिनदार: योगेश जयंतीलाल शहा
कार्यकारिणी सदस्य:
-अमोल रमणलाल झवेरी
-आशिष सुभाषचंद्र मेहता
-प्रियेश विलास शहा
-केतन अशोक शहा
-राकेश धन्यकुमार गांधी
-मिनल रजनीकांत शहा
-अॅड. निलेश सतिश शहा
– भारतीबेन राजेंद्र शहा
मावळत्या अध्यक्षांकडून अभिनंदन –
संस्थेचे मावळते अध्यक्ष दिलीप डी. मेहता यांनी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, संस्थेतर्फे जैन वधू-वर परिचय मेळावे, पुस्तिका आणि उपवर जैन वधू-वरांसाठी माहिती केंद्र तसेच ‘शुभमंगल योजना’ यांसारखे उपक्रम राबवले जातात.





