Pune: आईनेच मुलीचे अश्‍लील व्हिडिओ काढले

Updated On:
Pune:  आईनेच मुलीचे अश्‍लील व्हिडिओ काढले

पुणे : आईने स्वत:च्या मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून ते मुलीच्या मावशीला व अन्य नातेवाईकांना पाठवले. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, आईने तिच्या प्रियकरासोबत पळ काढला. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने तांत्रिक तपासाद्वारे खडकवासला परिसरातून शनिवारी (दि. १२) आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने तिच्या आई विरोधात पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. आईनेच मुलीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते मावशीसह अन्य नातेवाईकांना आणि तिच्या बॉयफ्रेंडला पाठवल्याचे
तक्रारीत म्हटले होते.

याप्रकरणी गुन्हा दाखल होताच आईने तिच्या प्रियकरासह शहर सोडले. पोलिसांनी तांत्रिक तपासावरून सोलापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि दौंड परिसरात आरोपींचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. अखेर १० दिवसांपूर्वी त्यांचे लोकेशन खडकवासला येथे असल्याचे बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला समजले.

त्यानुसार पोलिसांनी हा परिसर पिंजून काढत शनिवारी आई आणि तिच्या प्रियकराला अटक केली. मुलीला आईच्या अनैतिक संबंधांबद्दल माहिती झाल्याने, तीने घरमालकाला याबाबत सांगितले होते. त्याचा राग मनात धरून आरोपी आईने असे कृत्य केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस कर्मचारी रक्षित काळे, गायकवाड यांच्या पथकाने केली.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

2026-10-07 11:15:40

Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

2026-10-06 13:03:57

Ranjangaon : सुपारी दिली मालकाच्या हत्येची अन् गोळ्या लागल्या निष्पाप कामगाराला; पाच जणांना अटक, दोघांचा शोध सुरू

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर