पुणेकरांनो लक्ष द्या! धूलीवंदनानिमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो अर्धा दिवस बंद, कधी होणार सुरु?
Pune Metro Update : धूलीवंदन (धुळवड) सणामुळे ३ मार्च रोजी सकाळी ६ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पुणे मेट्रो सेवा बंद राहणार आहे.
Pune Metro Update : पुणे शहरातील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना आहे. धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर ३ मार्च २०२६ रोजी पुणे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.
मेट्रो प्रशासनाच्या माहितीनुसार, ३ मार्च रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत प्रवासी सेवा पूर्णपणे बंद राहील. दुपारी ३.०० नंतर ते रात्री ११.०० पर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे.
सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सुरक्षितता आणि आवश्यक सुरक्षाव्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मेट्रो प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० : मेट्रो सेवा पूर्णपणे बंद
दुपारी ३.०० ते रात्री ११.०० : मेट्रो सेवा नियमित सुरू
पर्यायी प्रवासासाठी PMPML बस किंवा इतर वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन
प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.



