Pune News : पुणेरी मेट्रोच्या स्थानकांवर बालदिनाचा उत्साह; विविध उपक्रमांना मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Pune News : पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) यांच्या वतीने पुणे मेट्रो मार्गिका तीनच्या स्थानकांवर १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Pune News : पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल) यांच्या वतीने पुणे मेट्रो मार्गिका तीनच्या स्थानकांवर १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी बालदिनानिमित्त दोन दिवसीय विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune News)
‘लर्न, क्रिएट, एक्सप्लोर’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाला पहिल्याच दिवशी, शनिवारी मुलांसह पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवारी (१५ नोव्हेंबर) देखील विविध उपक्रम सुरू राहणार आहेत. (Pune News)
माण-हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान धावणाऱ्या २३.३ किलोमीटर लांबीच्या पुणे मेट्रो मार्गिका तीनची माहिती मुलांना व्हावी, तसेच विविध सर्जनशील उपक्रमांच्या माध्यमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (Pune News)
या उपक्रमांतर्गत म्हाळुंगे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल मेट्रो स्थानकावर विशेष स्थानक भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पालकांसह आलेल्या मुलांना छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणे मेट्रो मार्गिका तीनच्या उभारणीचा प्रवास आणि प्रकल्पाची वैशिष्ट्ये जाणून घेण्याची संधी मिळाली. तसेच मेट्रो ट्रेनचे प्रतिकृती मॉडेल दाखवून मेट्रोची रचना आणि कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. (Pune News0
याशिवाय, सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून मुलांना विद्यापीठाचा समृद्ध इतिहास, वास्तू आणि सांस्कृतिक वारसा जाणून घेता आला. (Pune News)
एसपीपीयू मेट्रो स्थानकावर सकाळी ११ ते सायंकाळी सात या वेळेत विविध सर्जनशील कार्यशाळा आणि संवादात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन विभागाच्या वतीने चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच पेस्ट्री शेफ अक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली ख्रिसमस केक पॉप्स बनविण्याची कार्यशाळा आणि कलाकार मंजिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हँडब्लॉक प्रिंटिंग कार्यशाळा घेण्यात आली. (Pune News)
इकोकारीच्या वतीने आयोजित कीचेन बनविण्याच्या कार्यशाळेत मुलांनी वापरलेल्या खाद्यपदार्थांच्या वेष्टनांपासून आकर्षक वस्तू तयार करण्याचा अनुभव घेतला. तसेच कलाकार वसंत अभिमन्यू यांच्या ‘अक्षर गणेश’ या उपक्रमातून मुलांना अक्षरांच्या माध्यमातून गणेशाची कलाकृती साकारण्याची संधी मिळाली. (Pune News)
यावेळी लिटल लीफच्या वतीने पुस्तकदान आणि जनजागृती उपक्रमही राबविण्यात आला. गरजू मुलांपर्यंत पुस्तके पोहोचविण्याच्या उद्देशाने या उपक्रमात जुने कागद, मासिके, पुस्तके आणि पुठ्ठ्याचे खोके जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. (Pune News)
रविवारी (१५ नोव्हेंबर) देखील सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत हे उपक्रम होणार असून, अधिकाधिक मुलांनी आणि पालकांनी कार्यशाळा, हेरिटेज वॉक उपक्रमात सहभागी व्हावे तसेच म्हाळुंगे येथील मेट्रो स्थानकाला भेट द्यावी, असे आवाहन पीआयटीसीएमआरएल’तर्फे करण्यात आले आहे. (Pune News)
या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची ओळख करून देण्याबरोबरच मेट्रो प्रकल्पाविषयी उत्सुकता निर्माण करणे आणि शिक्षणासोबतच मनोरंजनाचा अनुभव देणे, हा पीआयटीसीएमआरएलचा उद्देश आहे. (Pune News)





