Pune: त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर बैठक; पोलिस आयुक्तांकडून शहरातील कायदा सुव्यवस्थेवर वॉच ठेवण्याच्या सूचना
Updated On:

पुणे – त्रिपुरातील वादानंतर अमरावतीसह काही ठिकाणी हिंसाचार उफळून आला होता. त्याअनुषंगाने सुरक्षिततेबाबत पोलीस आयुक्तालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात काही ठिकाणी झालेल्या हिंसाचारामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर बारीक लक्ष ठेवणे महत्वाचे आहे. त्यापार्श्वभूमीवर अधिकार्यांनी हद्दीतील शांतता कायम ठेवण्यासाठी दक्ष राहण्याचा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत.
त्रिपुरामध्ये झालेल्या वादाप्रकरणी एका संघटनेने 12 नोव्हेंबरला पुकारलेल्या बंददरम्यान अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद कारंजा याठिकाणी हिंसाचार उफळून झाला होता. त्यापाश्र्वभूमीवर पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.





