पीएमपीच्या 17 मार्गावर कायमची फुली; बसच केली बंद

पुणे – कमी उत्पन्न देणाऱ्या 24 मार्गांवरील 40 बसफेऱ्या बंद करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे 17 मार्गांवरील बसच बंद झाली आहे. तर, गर्दीच्या 24 मार्गांवरील बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीएमपीकडून उत्पन्नात वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या शहरातील 90 टक्के मार्ग हे तोट्यात चालत आहेत. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने वाहकांच्या मदतीने ते काम करत असलेल्या मार्गाचे सर्वेक्षण केले. कोणत्या मार्गावर पीएमपीला जास्त उत्पन्न मिळते. कोणत्या मार्गावर प्रवासी कमी आहेत. तर, कोणत्या मार्गावर प्रवासी संख्या जास्त आहेत, अशी सर्व माहिती वाहकांकडून घेण्यात आली. त्यानुसार वाहकांनी चार हजार सूचना पीएमपी प्रशासनाला दिल्या होत्या.
तूर्त शेअरमध्ये फक्त 15 टक्क्यांची गुंतवणूक; भविष्य निर्वाह निधीच्या ट्रस्टीचा निर्णय
आता 15 मार्गांवर फक्त एकच फेरी, दोन मार्गांवर दोन फेऱ्या सुरू होत्या. त्यादेखील बंद करण्यात आल्या आहेत. सर्वांत जास्त शेवाळेवाडी डेपोच्या बसचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. तर, पुणे स्टेशन, हडपसर, निगडी यांच्या प्रत्येकी तीन मार्गांवरील फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत.
ब्लूचिप कंपन्यात देशी गुंतवणूक वाढली; परदेशी संस्थागत गुंतवणूकीचे प्रमाण झाले कमी
बंद झालेले बस क्रमांक आणि मार्ग
88 – स्वारगेट ते मिडी पॉइंट, 80-मनपा भवन ते आदित्य गार्डन सोसायटी, 73-उरुळीकांचन ते खामगाव, 28- स्वारगेट ते कात्रजमार्गे लेकटाऊन, 147 वाघोली ते न्हावी सांडस, 162-वाघोली ते करंदीगांव, 264-भोसरी ते पाबळगांव, 329-निगडी ते देहूगाव, 371- राजगुरूनगर ते कडूस, 319-पिंपळेगुरव ते पिंपळेगुरव मार्ग काटेपुरम, 319 (अ) – पिंपळेगुरव ते पिंपळेगुरव मार्गे शितळादेवी चौक, 190-हडपसर फुरसुंगी, हडपसर हरपळेवस्ती, 190 (अ) हडपसर फुरसुंगी हडपसर शेवाळवाडीमधून, 220 यवत ते सासवड, 149 (अ) – शेवाळवाडी ते पिंपरीगाव, 93 – डेक्कन ते पिंपळे निलख, 105-डेक्कन ते मिडी पॉइंट

