पुणे : निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू वस्तीमध्ये बिबट्याची एन्ट्री ; वनविभाग अन् रेस्क्यू टीमकडून बिबिट्या जेरबंद

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील निगडी याठिकाणी बिबट्याने एंट्री केली आहे . मात्र याबाबत माहिती मिळताच वनविभाग अन् रेस्क्यू टीमकडून बिबिट्या जेरबंद करण्यात आले आले. पुणे वन विभाग, रेस्क्यूचॅरिटेबल ट्रस्ट (RESQ CT), PCMC पोलीस आणि अग्निशमन दल यांनी तातडीने आणि समन्वयाने बचाव मोहीम राबवली.
आज निगडित सकाळी वनाधिकाऱ्यांना परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक आणि अध्यक्ष नेहा पंचमिया यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी रेस्क्यू टीमला त्वरित घटनास्थळी पाठवले. टीम घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचे आकलन केले आणि बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले. बिबट्या सुरुवातीला सार्वजनिक उद्यानात दिसला होता, पण त्यानंतर एक बंद घराच्या आवारात प्रवेश केला. शोध घेतल्यावर बिबट्या त्या घराच्या मागील भागात एका टिनच्या शेडच्या मागे लपल्याचे दिसून आले.
पुणे वन विभाग, रेस्क्यू CT टीम आणि पीसीएमसी पोलीस यांनी अत्यंत काळजीपूर्वक पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण बिबट्याने उडी घेत एका खोलीच्या बाहेर गडद भागात लपला, ज्याठिकाणी घरात एक महिला आणि दोन युवक होते. दरम्यान ,”योग्य आणि वेळीच कारवाई करण्याची गरज ओळखून, RESQ CT चे पशुवैद्यक डॉ. कल्याणी ठाकूर यांनी सुरक्षितपणे बिबट्याला ट्रँक्विलाइझ (बेशुद्ध) केले. औषधाचा परिणाम होताच, बिबट्याला काळजीपूर्वक बाहेर काढून रेस्क्यू ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी हलवण्यात आले. बिबट्या निरोगी नर असल्याचे आढळून आले असून, तो सध्या बावधन येथील वन्यजीव संक्रमण उपचार केंद्रात वैद्यकीय तपासणीखाली आहे,” असे रेस्क्यू CT, पुणे यांच्या संस्थापक नेहा पंचमिया यांनी सांगितले.
“ही संपूर्ण बचाव मोहीम पुणे वन विभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, PCMC पोलीस, PCMC अग्निशमन दल, वन्यजीव वॉर्डन आदित्य परांजपे आणि स्थानिक संस्था स्केल्स अँड टेल्स यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यशस्वी झाली. अशी माहितीपुणे वन विभागाचे वन अधिकारी महादेव मोहिते यांनी दिली.





