पुणे । खडकवासला धरणातून चार वाजता 35 हजार क्यूसेकने होणार विसर्ग

पुणे । खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा सायकाळी ४ते 6:00वा. 35574 क्यूसेक्स करण्यात येत आहे. तसेच धरण परिसरात 100 mm व घाटमाथ्यावर 300 mm पेक्षा जास्त सरासरी पावसाची नोंद झालेली आहे.
तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे याची नोंद घेण्यात यावी. शहरातील पुढील ठिकाणी त्वरित दक्षता घेण्यात यावी. संबंधित ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात यावा.
पुणे महानगर पालिका हद्दीत बालेवाडी ब्रीज, मुळा नदी ब्रीज, संगम रोड ब्रीज, होळकर ब्रीज, संगमवाडी ब्रीज, महर्षी शिंदे ब्रीज, हडपसर- मुंढवा रोड ब्रीज, मातंग ब्रीज, येरवडा शांतीनगर येथील ब्रीज, निंबजनगर ब्रीज, मोई, व चिकली रस्त्यावरील इंद्रायणी पुल पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत.
भिडे पूल, गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती कॉलेज परिसर , शितळा देवी मंदिर डेक्कन, संगम पूल पुलासमोरील वस्ती, होळकर पूल परिसर पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. कॉर्पोरेशन जवळील पूल बंद करण्याची दक्षता घेण्यात आली आहे. पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.





