Pune News : कात्रज तलाव परिसरात दुर्दैवी घटना! कठड्यावरून दरीत कोसळून ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
Pune News : पुण्यातील प्रसिद्ध कात्रज तलाव परिसरात रविवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune News : कात्रज तलाव परिसरात रविवारी एक दुर्दैवी घटना घडली. तलावालगत असलेल्या कठड्यावरून खाली कोसळल्याने ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्ती दारूच्या नशेत असल्याचा संशय असून त्यातून हा अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Pune News)
तलाव परिसरातील सुरक्षा रक्षकाला तलावाच्या शेजारील मोकळ्या जागेत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने भारती विद्यापीठ पोलिसांना याची माहिती दिली. (Pune News)
माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित व्यक्ती खोल दरीत पडल्याने तातडीने अग्निशामक दल व रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून व्यक्तीला वर काढले. (Pune News)
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय कार्यवाहीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू असून घटनेचा अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. (Pune News)





