Pune : कलिंगड, खरबूज, पपई, लिंबू महागले
Updated On:

पुणे : मार्केट यार्डातील फळ बाजारात आवकच्या तुलनेत मागणी वाढल्याने कलिंगड, खरबूज, पपईच्या भावात किलोमागे दोन ते पाच रुपये वाढ झाली आहे. याखेरीज, लिंबालाही मागणी वाढल्याने 15 ते 20 किलोच्या गोणीमागे भाव दोनशे रुपयांनी वधारले आहेत.
मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळांचे भाव मागील आठवड्याच्या तुललेत स्थिर आहेत. येथील बाजारात रविवारी (दि. 2) मोसंबी 40 ते 50 टन, संत्री 50 ते 60 टन, डाळिंब 25 ते 30 टन, पपई 15 ते २० टेम्पो, लिंबांची सुमारे 1 हजार 200 ते 1 हजार 300 गोणी, कलिंगड 50 ते 60 टेम्पो, खरबूज 30 ते 40 टेम्पो, चिकू दोन हजार बॉक्स, पेरू 10 टन, अननस 5 ते 6 ट्रक व स्ट्रॉबेरीची 2 ते 3 टेम्पो एवढी आवक झाली होती.





