Pune : नवीन महाबळेश्वर कसे असावे?

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) नवीन महाबळेश्वर प्रकल्पाचा विकास आराखडा प्रकाशित केल्यापासून जवळपास ९०० प्रस्ताव दाखल झाले आहेत. यातील १० टक्केच प्रस्ताव हरकतींचे असून, बाकी ९० टक्के सूचनेच्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या व्यतिरिक्त इको-सेन्सिटिव्ह झोन असलेल्या हिल स्टेशनलगतच्या गावांतील रहिवाशांनी या प्रकल्पात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
“एमएसआरडीसी’ने १० ऑक्टोबर २०२४ रोजी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या सुधारित मसुदा विकास आराखड्यावर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवणारी अधिसूचना जारी केली. अनेक गावे या प्रकल्पात सहभागी होण्यास उत्सुक आहेत आणि विशिष्ट गावांमधील प्रस्तावित उपक्रमांबाबत चौकशीही वाढली आहे.
आम्हाला पाचगणीतील गावे आणि पश्चिम घाटाच्या जवळपासच्या इको-सेन्सिटिव्ह भागांचाही या प्रकल्पात समावेश करण्याच्या मागण्या आल्या आहेत, असे भोपळे म्हणाले. सूचना आणि हरकतींवर प्रत्यक्ष सुनावणी जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर अहवाल सरकारला सादर केला जाईल.
आम्हाला मिळालेल्या प्रतिसादांत बहुसंख्य सूचना होत्या. ज्यात प्रकल्पात नवीन गावे समाविष्ट करण्याच्या मागणीचा समावेश होता. ही मागणी प्रकल्पाच्या शाश्वत पर्यटन-आधारित मॉडेलमधून निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये कोणतेही भूसंपादन समाविष्ट नाही.
– जितेंद्र भोपळे, नगर नियोजन संचालक, एमएसआरडीसी
* गावकऱ्यांना प्रकल्पाचे सादरीकरण
याआधी डिसेंबरमध्ये न्यू महाबळेश्वर प्रकल्पाबाबत नागरिकांच्या चिंता दूर करण्यासाठी मुंबईत मोठा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बैठकीला २३५ प्रस्तावित गावांपैकी १०५ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण जाधव, ज्यांनी बैठक आयोजित करण्यात सक्रिय भूमिका बजावली. आम्ही नागरिकांच्या समस्या, मुख्यत्वे भूसंपादन आणि स्थलांतराशी संबंधित आहेत. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाचे स्पष्टीकरण दिल्यानंतर, अनेक उपस्थितांनी सहभाग घेण्यास सहमती दर्शवली.
* प्रमुख उद्दिष्टे
– पर्यटन विकासाचे प्रभावी व्यवस्थापन
– २० पर्यटन केंद्रांची वाढ
– स्थानिक ग्रामस्थ, छोटे व्यापारी, तरुण, उद्योजक आणि कारागीर यांच्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे
– आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी स्थानिकांचा सहभाग
* असा आहे विकास आराखडा
महाबळेश्वर परिसरातील
२९३
गावांचा समावेश
१,१५३ चौरस किलोमीटर
नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन अधिसूचित क्षेत्र
कनेक्टिव्हिटीसाठी
रोप-वे आणि जलमार्गावर भर




