Pune: पोलिसांसमोर टोईंग व्हॅन कामगार आणि दुकानदाराची जोरदार हाणामारी; पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत, CCTV Video Viral

Updated On:
Pune: पोलिसांसमोर टोईंग व्हॅन कामगार आणि दुकानदाराची जोरदार हाणामारी; पोलिस केवळ बघ्याच्या भूमिकेत, CCTV Video Viral

पुणे – बेशिस्त वाहनचालकांच्या विरुद्ध कारवाईसाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या टोईंग व्हॅनवरील कामगार आणि एका दुकानदाराची हाणामारी झाल्याची घटना हडपसर भागात घडली. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर वाहतूक पोलिसांच्या कारभारावर प्रचंड टीका झाली.

हडपसर भागात रमेश बराई यांचे पादत्राणे विक्रीचे दुकान आहे. बराई यांच्या दुचाकीतून पेट्रोल गळती होत होती. बराई यांनी दुकानासमोर दुचाकी लावून पाहणी केली. तेवढ्यात वाहतूक शाखेची टोईंग व्हॅन तेथे आली. टोईंग व्हॅनमधील कामगाराने दुचाकी उचलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी बराई चिडले. बराई आणि कामगारात बाचाबाची झाली.

चिडलेल्या बराई यांनी कामगारावर वीट उचलली. टोईंग व्हॅनमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यासमोर बराई आणि कामगाराची हाणामारी झाली. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने बघ्याची भूमिका घेतली. दुकानासमोरील सीसीटीव्ही चित्रीकरणात हा प्रकार कैद झाला.

याबाबतची ध्वनीचित्रफित समाजमाध्यमात प्रसारित झाली. या प्रकरणी टोईंग व्हॅनवरील कामगारांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी बराई यांनी केली आहे. सम-विषम दिनांक न पाहता रस्त्यावर वाहने लावणाऱ्या चालकांच्या विरुद्ध कारवाईसाठी वाहतूक शाखेने एका कंपनीला गाडी उचलण्याचे (टोईंग व्हॅन) कंत्राट दिले आहे. टोईंग व्हॅनवरील कामगार वाहनचालकांशी अरेरावी करत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ