पुणे – पानशेत, वरसगाव आणि टेमघर या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील 24 तासांत चांगल्या स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत चांगली वाढ होत आहे. पानशेत धरण परिसरात 39 मिमी, वरसगावमध्ये 36 मिमी आणि टेमघर धरण परिसरात 118 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, खडकवासला प्रकल्पातील चार धरणांत मिळून एक़ूण पाणीसाठा 64 टक्के म्हणजे 18.63 टीएमसीवर पोहचला आहे. मागील काही दिवसांपासून धरण परिसरात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याचा ओघ वाढला असून, पाणी पातळीतसुद्धा वेगाने वाढ होत आहे. मागील 24 तासांत खडकवासला धरणात 27 मिमी पाऊस पडला आहे. खडकवासला धरण 62.17 टक्के भरल्याने धरणातून, 1 हजार 655 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे नाव – टीएमसी- टक्केवारी खडकवासला – 1.23 टीएमसी – 62.17 टक्के पानशेत – 6.65 टीएमसी – 62.44 टक्के वरसगाव – 8.76 टीएमसी – 68.36 टक्के टेमघर – 1.99 टीएमसी – 53.74 टक्के एकूण – 18.63 टीएमसी – 63.92 टक्के