नगदवाडी : नगदवाडी (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळेत शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सत्कार सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले, अशी माहिती मुख्याध्यापक सखाराम शेंडकर यांनी दिली. या सोहळ्यात गावातील शिक्षण क्षेत्रात अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या, विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार घडवणाऱ्या आणि त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समिती, शाळा सल्लागार समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती आणि महिला तक्रार निवारण समिती यांच्या वतीने शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी कांदळी गावचे माजी आदर्श सरपंच बाळासाहेब बढे, जुन्नर तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अशोक बढे, शाळा सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बढे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश बढे, समिती सदस्य तानाजी बढे, दिपाली जाधव, अक्षदा जाधव, दिनेश कुतळ, रविंद्र काळे, संतोष बढे, अभिजित बढे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. सत्कार सोहळ्यात मुख्याध्यापक सखाराम शेंडकर, दीपक घाडगे, मंगेश मेहेर, पंडित चौगुले, नीलेश शेलार, विद्या वाघ, सुप्रिया अभंग, आशा आरेकर, उज्वला कांबळे, दिलीप तोतरे, राजेश जाधव, संकल्प चासकर आणि संगिता गाडेकर या शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन शाळा व्यवस्थापन समिती, शाळा सल्लागार समिती, शिक्षक-पालक संघ, माता-पालक संघ, सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समिती आणि महिला तक्रार निवारण समिती यांनी संयुक्तपणे केले.