Pune District : दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी धमाकेदार ऑफर्स
Pune District : भारतीय संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून, या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची आपल्याकडे पारंपरिक प्रथा आहे.

माळेगाव : दसऱ्यापासून सुरू होणाऱ्या आणि दिवाळीपर्यंत चालणाऱ्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर, माळेगाव येथील सुप्रसिद्ध आणि अत्याधुनिक ‘एस. पी. सराफ प्रा. लि.’ या सराफी पेढीतर्फे ग्राहकांसाठी अत्यंत आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आलेल्या आहेत. सणाच्या या काळात सोने व चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार असल्याची माहिती पेढीचे डायरेक्टर शिवाजी क्षीरसागर यांनी दिली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये दसरा आणि दिवाळी या सणांना अनन्यसाधारण महत्त्व असून, या शुभमुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याची आपल्याकडे पारंपरिक प्रथा आहे. ग्राहकांची हीच परंपरा जोपासत ‘एस. पी. सराफ’ने यंदा दागिन्यांच्या खरेदीवर विशेष सवलती आणि लाभ देऊ केले आहेत. यामुळे ग्राहकांना सणासुदीच्या खरेदीत मोठा आर्थिक फायदा मिळवता येणार आहे.
केवळ माळेगावच नव्हे, तर परिसरातील गावे तसेच इतर तालुक्यांमधूनही मोठ्या संख्येने ग्राहक या पेढीत विश्वासाने खरेदीसाठी येतात. पारदर्शक कारभार, ग्राहकांच्या हिताला कायम प्राधान्य, प्रत्येक दागिन्यावरील अचूक वजन आणि उच्च दर्जाची शुद्धता यामुळे ‘एस. पी. सराफ’ ही गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांची अत्यंत विश्वासू पेढी ठरली आहे. ग्राहकांना मिळणारी उत्तम सेवा आणि समाधान हीच आमची खरी पावती असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
विशेष ‘डबल’ ऑफर
या सणासुदीचे औचित्य साधून पेढीने एक अत्यंत आकर्षक योजना आणली आहे. त्यानुसार, येत्या १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत जे ग्राहक सोन्याचे दागिने खरेदी करतील, त्यांना खरेदी केलेल्या सोन्याच्या वजनाच्या दुप्पट वजनाची चांदी पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. सणासुदीच्या या आनंदाच्या काळात ग्राहकांनी या विशेष योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला सण अधिक आनंददायी आणि द्विगुणित करावा, असे आवाहन ‘एस. पी. सराफ प्रा. लि.’चे चेअरमन शिवाजी क्षीरसागर यांनी केले आहे.





