Pune Gramin : एसटीमध्ये चढत असताना महिलेचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्याने केली लंपास

शिरूर : शिरुर बसस्थानकात एसटी बस मध्ये चढत असताना महिला प्रवाश्याचे अज्ञात चोरटयाने त्यांच्याकडील २,१२०००/-रू किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली आहे. शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिभा अमोल नांदवडेकर ( वय ३१ वर्षी ) धंदा-घरकाम, रा. रूम नं. ३०२ महालक्ष्मी अपार्टमेंट विनायकनगर,मोरेगाव नालासोपारा ,मुंबई यांनी अज्ञात चोरट्याविरोधात फिर्याद दिली आहे.
10 संप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ही घटना शिरूर बस स्थानक मध्ये घडली. फिर्यादी महिला शिरूर बस स्थानक येथे शिरूर ते पुणे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्याच्या कडील २,१२०००/-रू किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली. अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदर उबाळे हे अधिक तपास करीत आहे.





