pune gramin : सातगाव पठार भागात आत्ताच पाणीटंचाई

पेठ – अपुऱ्या पावसामुळे गेली काही वर्षे सातगाव पठार (ता. आंबेगाव) मध्ये खरीप लागवड जुलै महिन्याच्या अखेरीस चालू होते आहे. चालू वर्षी देखील खरीप हंगाम ऑगस्टदरम्यान चालू झाला. एक महिना उशीर झाल्यामुळे रब्बीतील पिकांना पाण्याने ताण दिला आहे. बोअरवेल, विहिरी, तळे यांमधील पाणी संपल्यामुळे शेतातील पिके कसे जगवायचे, असा प्रश्न सातगाव पठार भागातील शेतकऱ्यांना पडलेला आहे.
यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्याने खरीप हंगाम एक महिना उशिरा सुरू झाला. याबरोबरच रब्बीसाठी आवश्यक परतीच्या पाऊस झाला नसल्यामुळे सातगाव पठार भागात आत्ताच पाणीटंचाई जाणू लागली आहे. मृग नक्षत्रात पेरणी व्हावी अशी शेतकऱ्यांची इच्छा असते; पण अलीकडच्या काळात पाऊस उशिरा सुरू होत असल्याने पुढील काळातील शेतीचे नियोजन आणि आवश्यक आणि उर्वरित पाणीपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांसामोरे मोठी समस्या आहे.
रब्बी पिके धोक्यात
ऑगस्टमध्ये बटाटा लागवड झाल्यानंतर सातत्याने पाऊस पडत राहिला त्याचा परिणाम बटाटा पिकाच्या गळीतावर होऊन अपेक्षेपेक्षा कमी गळीत झाले. त्यानंतर रब्बी पिकामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. गहू, हरभरा अशी पिके पण घेतली आहेत; पण परतीचा पाऊस झालाच नाही. परतीच्या पावसाने धोका दिल्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली गेली त्यामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली.’
शाश्वत पाणी योजना नाही
सातगाव पठार भाग उंचावर असल्यामुळे पावसाचे पाणी पठार भागांमध्ये थांबत नाही. उताराच्या दिशेने पाणी निघून जाते. या भोत कोणतीही शाश्वत पाणी योजना नसल्यामुळे सातगाव पठार भागाला नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते हे वास्तव आहे. सातगाव पठार भाग उंचावर असल्यामुळे पावसाचे पाणी पठार भागांमध्ये थांबत नाही. उताराच्या दिशेने पाणी निघून जाते. या भोत कोणतीही शाश्वत पाणी योजना नसल्यामुळे सातगाव पठार भागाला नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते हे वास्तव आहे.





