Pune Gramin : ‘संतोष शिंदे’ यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव.!
या वार्षिक सर्वसाधारण सभेत कांदा,टोमॅटो तसेच दर्जेदार तरकारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

Pune Gramin – जुन्नर येथे कृषि ऊत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या वतीने संतोष दादाभाऊ शिंदे यांना प्रगतशील शेतकरी म्हणून जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सहपत्निक गौरविण्यात आले. दि. ३० सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा गौरव सोहळा पार पडला.
यावेळी जुन्नर चे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड संजय काळे, उपसभापती निवृत्ती काळे, कृषी रत्न अनिल मेहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नर तालुका अध्यक्ष विकास दरेकर, संचालक माऊली खंडागळे, गुलाब नेहरकर, जि प सदस्य गुलाब पारखे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप बाजार समितीचे सर्व संचालक मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग उपस्थित होता.
वारुळवाडीचे शेतकरी संतोष शिंदे यांनी काकडी, टोमॅटो, फ्लॉवर, ढोबळी मीरची,कारले ,बारटोक वांगी अशा विविध प्रकारची दर्जेदार तरकारी भाजीपाला व सर्वांत जास्त ऊत्पन्न घेणारे शेतकरी म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जसे की शेडनेड,पाॅलीहाऊस ,ऊत्कृष्ट स्प्रेअर मशिन यांचा वापर करून रोजचा ३ ते ४ टन शेती माल त्यांनी नारायणगाव बाजार मार्केट मधे आणत आहेत तसेच द्राक्ष उत्पादक तसेच उद्योजक दिनेश शिंदे यांचे भाऊ म्हणून त्यांची ओळख आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेत कांदा,टोमॅटो तसेच दर्जेदार तरकारी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.





