Pune Gramin : प्रविण गायकवाड गीत गायन स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक सक्षमीकरण स्पर्धा कोयाळी पुनर्वसन तालुका शिरूर जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आल्या. शिक्षण अधिकारी संजय नाईकडे यांच्या संकल्पनेतून विविध प्रकारचे स्पर्धेचे आयोजन कोयाळी पुनर्वसन शाळेत केले होते.त्यात वैयक्तिक गीत गायन या प्रकारात पिंपरखेड शाळेचे पदवीधर शिक्षक प्रविण गायकवाड यांनी प्रथम क्रमांक मिळवला असल्याचे मुख्यध्यापक पी. सी.बारहाते यांनी सांगितले.
प्रविण गायकवाड हे संगीत विशारद असून गायन क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. शास्त्रीय संगीत विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.त्यांनी गायलेल्या भक्तिगीतांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. पिंपरखेड शाळेने या वर्षात अध्यक्ष चषक व मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून यावर्षी देखील जिल्हास्तरीय गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत मानाचा तुरा रोवला असल्याचे अध्यक्ष किरण ढोमे यांनी सांगितले.
शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी शिक्षकांना या स्पर्धा आयोजित करून कलागुणांना प्रोत्साहन दिले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.शिरूरचे गटशिक्षण अधिकारी बाळकृष्ण कळमकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, किसन खोदडे, पवार,मुकुंद देंडगे,यांनी अभिनंदन केले.यावेळी माजी जी. प. सदस्या कुसुम मांढरे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे,सरपंच रमेश गडदे, त्रिनयन कळमकर,शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.नियोजन मुख्याध्यापक संतोष विधाटे, व शिक्षकांनी केले.परीक्षण सिनेअभिनेते दिपक मोरे,संगीत विशारद हर्षदा फंड यांनी केले.





