रांजणगाव गणपती: वाघाळे तालुका शिरूर येथे नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात भक्तिमय वातावरणात व पारंपारिक रितीरिवाजाचे पालन करून साजरा करण्यात आला. वाघाळे येथे दरवर्षी नागपंचमीनिमित्त गावातील तरुण व पहिलवान वर्ग गावातील हनुमान मंदिरासमोरील शंभर व दीडशे किलो वजनाच्या दगडी गोटया खांद्यावरून उचलून टाकतात. काही उत्साही तरुण व पैलवान तर या गोट्या खांद्यावरती घेऊन मंदिराला प्रदक्षिणा देखील घालत असतात. नागपंचमी सणाच्या आधी पंधरा ते वीस दिवस या गोटया उचलण्यासाठी सराव करावा लागतो. त्यामुळे काही सेकंदातच या शंभर ते दीडशे किलो वजनाच्या गोटया अलगद खांद्यावरून उचलून टाकल्या जातात. हा सोहळा पाहण्यासाठी गावातील आबालवृद्ध या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.