pune gramin : इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली

चिंबळी -अवघ्या महाराष्ट्राच्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र देहू, आळंदी या पुण्यभूमी तीर्थक्षेत्रातून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात जलपर्णी बरोबरच आता मोठ्या प्रमाणावर साबणासारखा पांढरा शुभ्र फेस तयार झाला असल्याने दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण वाढले असल्यामुळे चिंबळी, कुरुळी, मोई, मोशी परिसरातील नदीकाठच्या जमिनीचे नुकसान झाले असून पिकांवर परिणाम झाला आहे.
चिंबळी गावाला या पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या परिसरात गेल्या आठवड्यापासुन ज्वारी, हरभरा, गहू, कांदा पिकांची काढणी करून ट्रॅक्टरच्या शेतीची मशागत करुन जनावरांना सुका चारा म्हणून साठवून केली असून उन्हाळी हंगामातील कमी अवधित व नगदी उत्पन्न मिळणारे बाजरी भुईमूग या पिकाची टोकण पद्धतीने लागवड सुरू केली आहे;
परंतु गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस व इंद्रायणी नदीच्या पात्रात जलपर्णी बरोबरच आता मोठ्या प्रमाणात साबणाचा फेस तयार झाला असल्याने शेतकरी वर्गाना पिकाना पाणी देताना दुर्गधीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे अंगाला खाज सुटते व सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, कप इतर आजारांन बेजार झाले आहे, तर या गोष्टींकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने पाहायला मिळत आहे.





