Pune Gramin : गावाकडून एव्हरेस्टकडे ! असं गाठलं काटी गावच्या राहुल मोहितेंनी एव्हरेस्ट बेस कॅम्प

इंदापूर : तालुक्यातील काटी गावचे रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे रिलायन्स रिटेल या कंपनी मध्ये जनरल मॅनेजर या पदावर असणारे, राहुल साहेबराव मोहिते यांनी जागतिक सर्वोच शिखर असलेला एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक पूर्ण केला आहे.
एव्हरेस्ट शिखर हे नेपाळमधील जगातील सर्वात प्रसिद्ध आणि आव्हानात्मक ट्रेकिंग मार्गांपैकी एक आहे. अनेक गिर्यारोहक आणि निसर्गप्रेमी यांचे एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचण्याचे स्वप्न असते. हेच स्वप्न माझे होते… अशी माहिती राहुल मोहिते यांनी दिली.
एव्हरेस्ट शिखर बेस कॅम्प ट्रेक ५,३६४ मीटर व १७,५९८ फूट एवढे अंतर चालून पूर्ण केले आहे.साधारणपणे हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी १२ ते १४ दिवस लागले.१४°C या ट्रेकमध्ये उंची वाढत जाते,त्यामुळे हवामानाशी जुळवून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
उंचीमुळे मळमळ, डोकेदुखी आणि श्वास घ्यायला त्रास होणे यासारख्या समस्या येतात. अशा सर्व खडतड समस्यांना पार करत हा ट्रेक त्यांनी पूर्ण केला. यासाठी गेल्या एक वर्षापासून त्यांनी घेतलेली मेहनत व आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावरती हा ट्रेक पूर्ण करून इंदापूरचे नाव जागतिक लेव्हल पर्यंत पोहोचवले.
हा ट्रेक करण्यापूर्वी अनेक छोटे-छोटे ट्रेक वर्षभरात केले. जवळपास १५ किलो वजन कमी केले. धावणे व सायकल चालवणे असे शारीरिक तंदुरुस्तीसाठी तर कमी ऑक्सिजन मध्ये सुद्धा शारीरिक क्षमता टिकून राहावी यासाठी श्वसनाचे व्यायाम राहुल यांनी केले.





