Pune Gramin: मुरूम टाकण्याकरता खंडणी न दिल्याने आठ जणांची एकाला जबर मारहाण

शिरूर : शिरूर तालुक्यातील कर्डे येथिल अवैध्य मुरुम ऊपसा हा विषय ऐरणीवर आला असून हे तस्कर या मुरुम उपस्याच्या वादातून एकमेकांच्या जीवावर उठले आहे. राजरोसपणे प्रशासणाच्या नाकावर टिच्चून मुरुम ऊपसा व वाहतुक होत आहे.
तेथील तलाठी, मंडल आधिकारी, बीट अंमलदार पोलिस मग नेमक काय करतात हा प्रश्न उपस्थित होत आहे. मोठी आर्थिक तडजोड करुन हा व्यवसाय चालू असल्याची चर्चा शिरूर तालुक्यात होत आहे.
याच वादाची किनार या प्रकरणाला लागली असून बेकायदेशीर जमाव जमवून खंडणी मागून आठ जणांनी एकाला मारहाण करून त्याच्या ट्रकचेही नुकसान केले आहे. शिरूर पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. २९ जुलै रोजी दुपारी १.२० वा. सुमारास मौजे एस. व्ही. एस कंपनी येथील किरण रोडे याच्या निळ्या रंगाचा बंद टपरीजयळ फिर्यादी निलेश बाळासो महाडीक हेत्यांच्या कार मधुन जात असताना घ्या उर्फ अभिशेक मिसाळ, सकेंत महामुनी व त्यांचे बरोबर एक अनोळखी मुलगा यांनी त्यांच्याजवळीळ पल्सर मोटाररसायकल आडवी मारून निलेश महाडिक यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.
परंतु निलेश महाडिक तेथून कार घेवून पळून गेले. नतर दुपारी २वा. च्या सुमारास समाधान चौक, करडे येथे फिर्यादीनी मुरूम टाकण्या करीता महीन्याला १५ हजार रूपये हप्ता न दिल्याच्या कारणावरून १) घ्या उर्फ अभिषेक मिसाळ २) संकेत महामुनी ३) बाला शिंदे सर्व रा. शिरूर ४) शुभम पुर्ण नाव पत्ता माहीत नाही ५) नवनाथ कलींदर, ६) टिनु शेळके व
७) रोहन पंचमुख सर्व रा. राजणगाव ता. शिरूर पुणे ८) सुरज पाडळे रा. सोनेसांगवी ता. शिरूर पुणे यानी बेकायदा गर्दी जमाव जमवून निलेश महाडिक यांचा हायवा ट्रक न. एम.एच १२ यु.एम ९८७९अडवुन चालक जावेद हमीद शेख याला हाताने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी करून त्यांच्या हातातील लाकडी दाडके व दगडाने मारून हायवा ट्रकचे नुकसान केले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिरूर पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे करत आहे.





