Pune Gramin: कवठे येमाई हिलाळमळा येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Updated On:

शिरूर : कवठे येमाई येथील जिल्हा परिषद शाळा हिलाळमळा येथे श्रीमती इंदूमती वसंतलाल शाह चॅरिटेबल ट्रस्ट बोरिवली, मुंबई व घनसोली बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तुर्भे वाशी,नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम घनसोली बालाजी ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रेय बिरामने व कार्यवाहक एकनाथ बबन निचित यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुखदेव साळवे व उपाध्यक्ष बाळासाहेब हिलाळ, रामदास वाजे,
रखमाशेठ निचित, विश्वनाथ निचित, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, महिला भगिनीं व सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्याध्यापक नामदेव घोडे यांनी सर्वांचे आभार मानले.





