Pune Gramin: ‘नाई प्रतिष्ठानचा सामूहिक विवाह सोहळा २३ ऑगस्टला’; विण माने यांची माहिती

इंदापूर – सोनई प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी इंदापुरात वाघ पॅलेस या ठिकाणी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम वर्क सभापती प्रवीण माने यांनी दिली. शनिवारी १० ऑगस्ट रोजी इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोनाई प्रतिष्ठानच्या वतीने यापूर्वी सन २०१८ साली ७५ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा दिमाखात संपन्न केला होता हीच परंपरा पुढे चालू ठेवत यंदाच्या वर्षी देखील ५१ जोडप्यांचा विवाह सोहळा पार पाडला जाणार आहे.
शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत हळदीचा कार्यक्रम ११ ते ३ भोजन तीन ते पाच वाजेपर्यंत वरांची मिरवणूक (वरदवा) साडेपाच वाजता खासदार सुप्रिया सुळे ,खासदार अमोल कोल्हे,कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार सोनाई उद्योग समूहाचे प्रमुख दशरथ माने व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
बळीराजा संकटात आहे महाराष्ट्रावर मोठं संकट ओढावलेय या संकटातून बाहेर पडायचं असेल तर शरद पवार यांच्या शिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राला न्याय देणारा आणि महाराष्ट्राच्या मदतीला धावून येणारा माणूस म्हणजे शरद पवार त्यांच्या यांच्या विचाराचं सरकार येणं गरजेचं आहे तर बळीराजाचं सरकार येईल.
दरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेनंतर ५१ वधू-वरांना पोशाख व इतर साहित्याचे वाटप देखील करण्यात आले.आपण नुकतेच अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला असून आपल्या कार्यकर्त्यांना आपण आमदार व्हावे असे वाटते तुम्हाला वाटत नाही का?या पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना मलाही आमदार व्हाव असं वाटतं अशी प्रतिक्रिया प्रवीण माने यांनी दिली आहे.
बळीराजा संकटात आहे महाराष्ट्रावर मोठं संकट ओढावलेय या संकटातून बाहेर पडायचं असेल तर शरद पवार यांच्या शिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राला न्याय देणारा आणि महाराष्ट्राच्या मदतीला धावून येणारा माणूस म्हणजे शरद पवार त्यांच्या विचाराच सरकार येणं गरजेचं आहे.तर बळीराजाचं सरकार येईल.





