pune gramin : केसनंद ग्रामपंचायत ने उभारला 90 फुटी तिरंगा ध्वज; सरपंच दत्तात्रय हरगुडे यांची माहिती
Updated On:

वाघोली (प्रतिनिधी) – पुणे जिल्हा ग्रामीण भागामधील प्रथमच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केसनंद तालुका हवेली या ग्रामपंचायत च्या वतीने 90 फुटी उंच तिरंगा ध्वज उभारला आहे. ही जिल्ह्यातली पहिलीच ग्रामपंचायत आहे.
याकामी दिलीप हरगुडे, रमेश हरगुडे पाटील, मिलिंद हरगुडे, वाल्मीक हरगुडे, संतोष हरगुडे, भाऊसाहेब शिंदे यांच्या सहकार्यातून हा ध्वज उभा करण्यात आला असून या कामी ग्रामपंचायत कार्यकारिणीने मोलाचा वाटा उचलला असल्याचे सरपंच दत्ता हरगुडे, उपसरपंच रेखा सुभाष बांगर यांनी सांगितले.
केसनंद येथे उभारण्यात आलेला हा तिरंगा ध्वज केसनंद गावांमधील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन आणि देश प्रेमाचा संदेश देत असल्याचे माजी सरपंच सचिन माणिक हरगुडे यांनी सांगितले. सध्या जिल्हयातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.




