Pune : पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी सुरू

पुणे – पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी मंगळवारपासून सुरुवात झाली असून ६ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील. प्रारूप मतदार यादी २५ नोव्हेंबर आणि अंतिम मतदार यादी ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध होईल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना पुलकुंडवार म्हमाले की, दोन्ही मतदार संघासाठी नव्याने यादी तयार होत आहे. पुढील वर्षी निवडणूका होणार आहे.गेल्या निवडणुकीवेळी पुणे विभागातील पाच जिल्ह्यात पदवीधर मतदारांची संख्या ही ४ लाख २० हजाराहून अधिक तर शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या ७२ हजाराहून अधिक होती. मतदारसंख्येत वाढ व्हावी या दृष्टीने नियोजन आहे. राजकीय पक्षाकडून एक गठ्ठा मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीवेळी म्हणजे १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्ष आधी पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेली असावी. शिक्षक मतदार संघासाठी १ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सहा वर्षात किमान तीन वर्ष पूर्ण वेळ शिक्षक म्हणून काम करणारेच मतदार होऊ शकतील. येत्या दोन-तीन दिवसात ऑनलाइन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल.





