Pune : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिवलचे उद्घाटन

पुणे : दर्जेदार निवासी व व्यापारी संकुलांची निर्मिती करण्यात नावलौकिक असलेल्या गोखले कंस्ट्रक्शन्सच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिवलचे उद्घाटन आज रोजी कोथरूड येथील गोखले बिझनेस येथे संपन्न झाले. सदर फेस्टिवलचे हे सलग १३ वे वर्ष आहे.
बुलढाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक शिरीष देशपांडे, संचालक सुव्रत देशपांडे, विभाग प्रमुख योगिनी पोकळे, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, गोखले कंस्ट्रक्शन्सचे अर्चित, पूनम व विशाल गोखले, यंदाच्या प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये घर बुक केलेले घरखरेदीदार रश्मी मोघे, मृणाल, कल्याणी व राजन शेवडे व गोखले कंस्ट्रक्शन्सचे अतुल गलांडे आदी मान्यवर उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.
यंदाच्या प्रॉपर्टी फेस्टिवलविषयी माहिती देताना गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले म्हणाले, “शहरातील प्रमुख ठिकाणी साकारणाऱ्या विविध गृहप्रकल्पांचे पर्याय व आर्थिक दृष्ट्या अत्यंत लाभदायक अशा योजना यामुळे आमच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिवलला कायमच ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. शहराच्या विविध भागांमध्ये साकारत असलेल्या काही निवडक गृहप्रकल्पांमध्ये सदनिका घेतल्यास रुपये ९९९९ प्रती चौरस फुट असा अत्यंत विशेष दर यंदाच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिवलचे महत्वाचे आकर्षण आहे.”
यावर्षी पुण्यातील प्रभात रस्त्यावर साकारत असललेल्या भव्य गृहसंकुलांसाठी देखील वेगळी अशी विशेष सवलत योजना असणार आहे. याबाबत गोखले यांनी सांगितले की, “गेली १२ वर्षे ग्राहकांनी आमच्या नवरात्र प्रॉपर्टी फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावर्षी २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या नवरात्राच्या काळात घरखरेदीदारांना प्रभात रस्ता, शिवाजी नगर, सहकार नगर, कोथरूड, मॉडेल कॉलनी व कर्वे नगर येथे नजीकच्या भविष्यात साकारणाऱ्या भव्य व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असणाऱ्या निवासी प्रकल्पांच्या माध्यमातून ३ बीएचकेच्या सदनिकांपासून ७.५ बीएचकेच्या स्काय व्हिला पर्यंतचे पर्याय उपलब्ध असतील.”





